Uddhav Thackeray On Disha Salian : दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी राज्य सरकारच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांच्या विशेष चौकशी पथकाकडून पुन्हा चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. विरोधकांकडून दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर सतत आरोप केले जात आहेत. अशातच आज पहिल्यांदाच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. ज्या प्रकरणात काहीच पुरावे नाहीत, त्यावर एसआयटी लावली जाते. मात्र, आम्ही जे पुराव्यांसह मांडतोय, त्यावर एसआयटी लावली जात असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (Disha Salian Case)
अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद यावेळी सत्ताधारी महायुती, भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, अधिवेशनाची सुरुवात झाली तेव्हाच, अधिवेशन तेव्हाच मनात पाल चुकचुकली की अधिवेशन वेगळ्या ठिकाणी जातंय. ज्यांचा दुरान्वयेही एखाद्या घटनेशी संबंध नाही, अशा प्रकरणातही एसआयटी चौकशी लावली जात आहे. मात्र, विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे, दिलेल्या पुराव्यांविरोधात एसआयटी लावली जात नसल्याची चौफेर टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
ते पुढे बोलताना म्हणाले, नवाब मलिक यांच्यावर जे आरोप होते, तेच आरोप प्रफुल्ल पटेलांवरही आहेत. त्यांच्याबद्दल काय भूमिका आहे. असा आमचा प्रश्न आहे. त्यात काय चुकले? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच अधिवेशनात शेतकरी प्रश्न, दुष्काळ, अवकाळी पावसाने झालेले नुकसान असे अनेक मुद्दे आहेत, याच्यावर चर्चा व्हायला हवी. मात्र सरकारकडून फक्त घोषणाच होतात. त्यावर अंमलबजावणी होत नाही. असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.