पुणे : सध्या खाजगी टॅक्सीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यात ओला-उबर या टॅक्सी सेवांचे नाव पहिल्यांदा घेतले जाते. मात्र, याच ओला-उबर टॅक्सीच्या दराबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. यांसारख्या टॅक्सी सेवांचा पुण्यात भाडेनिश्चितीचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे मोबाईल अॅपवरील टॅक्सींच्या मनमानी भाडेआकारणीला चाप बसणार आहे.
पुणे आरटीओ येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांच्या अध्यक्षतेखाली रिक्षा संघटना, कॅब संघटना व ग्राहक मंच यांची बैठक झाली. या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले. ओला-उबर या टॅक्सी सेवेचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या बैठकीत भाडेनिश्चितीबाबत मान्यता देण्यात आली आहे. या बैठकीत ठरविण्यात असलेल्या दरांवर ओला-उबरसारख्या कंपन्या त्यांचे कमिशन लावतील आणि त्यानंतर कॅबचे दर निश्चित होणार आहेत. असे असले तरी रिक्षामध्ये सध्यातरी कोणतीही भाडेवाढ होणार नाही.
ओला, उबेरकडून ज्यादा आणि मनमानी पद्धतीने दर आकारले जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावर राज्य सरकारकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली. समाजाच्या हितासाठी लवकरच ओला आणि उबेरसारख्या टॅक्सींवरही लगाम लावणार असल्याचं राज्य सरकारनं यापूर्वी हायकोर्टात स्पष्ट केलं होतं. त्यानुसार, आता निर्णय घेतला जात आहे.
असे असतील कॅबचे दर…
1) नॉन AC कॅब – पहिल्या 1.5km साठी / Rs.31
2) नॉन AC कॅब पुढील प्रत्येक 1 km साठी / Rs.21
AC कॅबसाठी वरील दरामध्ये अतिरिक्त 25% रुपये लागतील.
पहिले 1.5km / Rs.39 नंतर प्रति किमी / Rs.26