पुणे: घराच्या बाजुला असलेल्या खड्ड्यातील पाण्यात खेळत असताना बहिण आणि दोन भावांचा पाण्यात आज बुडून मृत्यू झाला.
राकेश किशोर दास(वय 5) , रोहित किशोर दास (वय 8) तसेच श्वेता किशोर दास (वय 4) अशी त्यांची नावे आहेत. आंबेठाण येथील नामदेव भिकाजी लांडगे यांच्या शेतात ही दुर्घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मृत मुलांचे वडील किशोर दास हे कामगार असून आंबेठान येथे भाऊसाहेब लांडगे यांच्या खोलीत भाड्याने राहतात. त्याच्याजवळ असलेल्या शेतातील खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते, तिथे पाण्याचा अंदाज न आल्याने तीनही मुले बुडून मृत्यू पावले. मुलांच्या घरच्यांना माेठा धक्का बसला आहे. महाळूंगे पोलीस पुढील तपास करीत आहेत.