मुंबई : मासे आणि दूध एकत्र खाऊ नये असे सांगितले जाते कारण दुधासारख्या शीत पदार्थाबरोबर माशासारख्या उष्ण पदार्थाचे सेवन केले तर ते आरोग्यास बाधक ठरते म्हणूनच तो विरुद्ध आहार आहे. जे अन्नपदार्थ एकमेकांच्या विरुद्ध गुणधर्म असतात ते एकत्रिपणे सेवन केल्यास शरीरास अपायकारक ठरू शकतात.
विरुद्ध आहार म्हणजे काय?
विरुद्ध आहार म्हणजे ज्या आहारामुळे वात, पित्त आणि कफ या घटकांमध्ये असमोतल निर्माण होतो, त्यांना शरीराबाहेर काढून टाकण्याऐवजी ते शरीरातच साचून राहतात, त्याला ‘विरुद्ध आहार’ म्हणतात. तीन मूलभूत घटकांचे प्रमाण संतुलित असेल तर ते शरीराचे संचालक म्हणून काम करतात आणि त्यांचे संतुलन बिघडले तर ते शरीरासाठी घातक ठरतात, म्हणूनच त्यांना ‘दोष’ म्हणतात.
विरुद्ध आहाराचे लक्षण :
काळ विरुद्ध: हिवाळ्यात आपण अनेकदा थंड आईस्क्रीम खाणे, अवेळी जेवण करणे हा देखील विरुद्ध आहार आहे. वेळ आणि ऋतूनुसार विसंगत आहाराचे सेवन करणे यालाच काल विरु्द्द आहार म्हणतात.
देश विरुध्द: कोरडे वातावरण असलेल्या प्रदेशात कोरडे खाद्यपदार्थ खाणे हा विरुद्ध आहार आहे कारण विशिष्ट प्रदेशाच्या वातावरणानुसार अनुकूल नसलेला आहार एखादयासाठी अपायकारक ठरू शकते. यालाच देश विरुध्द आहार म्हणतात.
सात्म्य विरुद्ध: तिखट पदार्थ खाण्याची सवय असलेल्या व्यक्तीला गोड पदार्थ खायला देणे हा देखील विरुद्ध आहार आहे. एखाद्याच्या खाण्याच्या सवयीशी सुसंगत नसलेला आहार म्हणजे सात्म्य विरुद्ध आहार होय.
अग्निविरुद्ध: एखाद्या व्यक्तीला पचनाची समस्या असतानाही जड अन्नपदार्थ खाते तर एखादी व्यक्ती पचन क्षमता चांगली असेल हलका आहार घेणे हा देखील विरुद्ध आहार आहे. एखाद्याच्या पचनशक्तीला अनुसरून नाही अशा आहाराचे सेवन करणे म्हणजे अग्निविरुद्ध आहार होय.
मात्रा विरुद्ध: मध आणि तूप समान प्रमाणात घेणे हा देखील विरुद्ध आहार आहे. आवश्यक प्रमाण लक्षात न घेता आहार घेणे याला मात्रा विरुद्ध आहार म्हणतात.
संस्कार विरुद्ध: गरम केलेला मध हा विरुद्ध आहार आहे. विशिष्ट प्रकारे तयार केल्यावर काही अन्नपदार्थ विषारी बनतात, असा आहाराल संस्कार विरुध्द आहार म्हणतात.
दोष विरुद्ध: पित्ताचा त्रास असलेल्या व्यक्तीने पित्त वाढवणारे पदार्थ खाणे, वाताचा त्रास असलेल्या व्यक्तीने वातूळ पदार्थ खाणे, किंवा कफाचा त्रास असलेल्या व्यक्तीने कफ वाढवणारे पदार्थ खाणे हा देखील विरुद्ध आहार आहे. आयुर्वेदानुसार प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात वात, पित्त आणि कफ हे तीन घटक असतात. त्याप्रमाणे अन्नपदार्थांमध्येही वात, पित्त आणि कफ हे गुणधर्म असतात. जर एखाद्या व्यक्तीने दोषांसारखेच(वात, पित्त आणि कफ) समान गुण असलेले अन्नपदार्थ खाणे सेवन याला दोष विरुद्ध आहार म्हणतात.
वीर्य विरुद्ध: मासे आणि दूध एकत्र खाऊ नये असे सांगितले जाते कारण दुधासारख्या शीत पदार्थाबरोबर माशासारख्या उष्ण पदार्थाचे सेवन केले तर ते आरोग्यास बाधक ठरते म्हणूनच तो विरुद्ध आहार आहे. जे अन्नपदार्थ एकमेकांच्या विरुद्ध गुणधर्म असतात ते एकत्रिपणे सेवन केल्यास शरीरास अपायकारक ठरू शकतात त्याला वीर्य विरुध्द आहार असे म्हणतात. आयुर्वेदानुसार वीर्य म्हणजे गुणधर्म होय.
कोष्ठ विरुद्ध: काही लोकांचा पचनक्रिया अत्यंत चांगली आहे त्याला हलका, सहज पचणारा आहार देणे किंवा ज्याचा पचनाचा कोठा जड आहे त्याला पचण्यास जड पदार्थ देणे हा देखील विरुद्ध आहार आहे. अशा पदार्थांचे सेवन जे एखाद्याच्या कोष्टाच्या (पचनमार्गाचे स्वरूप) विरुद्ध आहेत त्यालाच कोष्ठ विरुध्द आहार म्हणतात.
अवस्था विरुध्द: शारीरिक श्रम केल्यानंतर वात वाढवणारा आहार घेणे किंवा झोपेतून उठलेल्या व्यक्तीने कफ वाढविणारा आहार घेणे, तापामध्ये पचण्यास जड अन्न खाणे हा देखील विरुद्द आहारा आहे. एखाद्याच्या आरोग्याच्या विपरीत आहार घेणे याला अवस्था विरुद्ध आहार म्हणतात.
क्रम विरुद्ध: मध खाल्ल्यानंतर गरम पाणी अथवा रात्री दही खाणे किंवा जेवणाच्या शेवटी गोड पदार्थ खाणे हा विरुद्ध आहार ठरू शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती शौचास जाण्यापूर्वी आणि लघवीच्या आधी अन्नाचे सेवन करते किंवा भूक लागलेली नसताना किंवा जास्त भूक लागल्यावर जेवण करते तेव्हा क्रम विरुद्ध आहार असतो.
परिहार विरुद्ध: तूप खाल्ल्यानंतर थंड पदार्थ खाणे, मासांहार केल्यानंतर उष्ण पदार्थांचे सेवन करणे. विशिष्ट औषध अथवा पदार्थ खाल्यानंतर काही पदार्थांचे सेवन करणे वर्ज्य असते. त्याला परिहार विरुद्ध आहार म्हणतात.
संयोग विरुद्ध : दुधासोबत आंबट पदार्थांचे सेवन, फळांची कोशिंबीर किंवा दूध किंवा केळी हा आहार देखीर विरुद्ध आहार आहे. जे खाद्यपदार्थांचा संयोग करणे चुकीचे आहे असे पदार्थ एकत्र करून खाणे म्हणजे संयोग विरुद्ध आहार होत.
ह्रदयविरुद्ध: कारले आवडत नसताना खाणे, वांगं आवडत नसताना खाणे. एखाद्याला आवडत नसलेला आणि चवीला रुचकर नसलेला आहार खाणे म्हणजे ह्रदयविरुद्ध आहार होय.
उपचार विरुद्ध : पित्ताचा त्रास असलेल्या व्यक्तीला पित्त वाढवणारे पदार्थ खाण्यासाठी देणे, मधुमेही व्यक्तीने गोड पदार्थ खाणे हा विरुद्ध आहार आहे. डॉक्टरांनी सांगतेल्या पथ्याचे पालन न करता घेतला जाणारा आहार हा उपचार विरुद्ध आहार असतो.
पाक विरुद्ध : जास्त शिजवलेले किंवा करपलेले अन्न खाणे हा देखील विरुद्ध आहार आहे. चुकीच्या पद्धतीने शिजवलेले अन्न यालाच पाक विरुद्ध आहार म्हणतात.
संपद विरुध्द : कच्चे, सडलेले पदार्थ खाणे हा विरुद्ध आहारच आहे. त्यालाच संपद विरुद्ध आहार असेही म्हणतात.
विधी विरुध्द : जेवताना बोलणे, सार्वजनिक ठिकाणी जेवणे, अशा आहाराच्या नियमांच्या विरुद्ध जाऊन आहार घेणे याला विधी विरुद्ध आहार म्हणतात. .