नागपूर : हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक कोणत्या गटात हा प्रश्न चर्चेत आला आहे. पहिल्या दिवशी अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक चर्चेच्या केंद्रस्थानी राहिल्यानंतर आज दुसरा दिवस सुद्धा आमदार नवाब मलिक यांच्या भूमिकेवरून गाजला. मलिक यांनी आज सुद्धा अधिवेशनाला हजेरी लावत काल बसलेल्या ठिकाणी जाऊन बसले. विधानसभा अध्यक्षांनी नवाब मलिक यांना जी खुर्ची बसण्यासाठी दिली होती. त्या खुर्चीवर न बसता त्यांनी शेवटच्या बाकावर जाऊन बसणं पसंत केलं. मात्र, नवाब मलिक यांच्यावरून सत्ताधाऱ्यांनीच त्यांना घेरल्याचे चित्र आहे.
फडणवीस यांचा लेटरबॉम्ब
देवेंद्र फडणवीस यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहित नवाब मलिक यांना महायुती सरकारमध्ये सामील करून घेऊ नये, असं म्हटलं होतं. यानंतर अजित पवार गट कोणती भूमिका घेणार? हे प्रसार माध्यमांनी त्यांनी विचार त्यावर, अजित पवार यांची चांगली चिडचिड झाल्याचे दिसून आले. ‘त्या’ पत्राचे मी काय करायचे ते पाहून घेईन तुम्हाला (मीडिया) सांगण्याची गरज नाही, अशी भूमिका त्यांनी माध्यमांशी बोलताना घेतली.
त्यानंतर प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बोलताना नवाब मलिक यांनी आपली कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे आम्ही नवाब मलिकांच्या बाबतीत भूमिका घेणे अयोग्य असल्याचे फडणवीस यांच्या कानावर घातलं. त्याचबरोबर आमदार म्हणून त्यांना सभागृहात बसण्याचा अधिकार असल्याचे सुद्धा पटेल यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले.
नाना पटोलेंचे भाजपवर टीकास्त्र
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले, नवाब मलिक यांचा धर्म पाहून भाजप त्यांना दूर करत आहे का या प्रश्नावर बोलताना. ते म्हणाले की, प्रश्न निर्माण होणारच. दाऊशी संबंध असल्याचा आरोप करत भाजपने नवाब मलिक यांना तुरुंगात टाकले, तर प्रफुल पटेल यांच्यावरही भाजपने इकबाल मिर्ची जो दाऊदचा मित्र आहे त्यासोबत संबंध असल्याचा आरोप केला. त्यानंतर ईडीने प्रफुल पटेल यांची संपत्ती जप्त केली होती.