Jitendra awhad on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात आरोप प्रत्यारोप तसेच एकमेंकावर टीका टिपण्णी सतत सुरु आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकास्र सोडलं होतं. आव्हाडांच्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख करत अजित पवारांनी टीका केली. यावर आता आव्हाडांनी द्वीटरवरुन जोरदार प्रत्युत्तर देत अजित पवारांवर जहरी टीका केली आहे. (Jitendra awhad on Ajit Pawar)
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या एक्स या खात्यावर पोस्ट लिहून अजित पवारांवर मिश्कील टिप्पणी केली. यावेळी जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांच्या वाढलेल्या पोटाचा फोटो शेअर करत म्हणाले, “दादा त्या दिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला तेव्हा मला वाटले की तुम्ही व्यायाम करुन ‘सिक्स पॅक अब्ज’ तयार केले असतील. पण हा परवाचा फोटो आहे. त्यात तुमची ढेरी दिसत आहे. हाहा”
तसेच आव्हाड यांनी याबाबत आणखी एक द्वीट केलं आहे. म्हणाले, अजित पवार यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली नसती तर मी त्यांच्या विरोधात एक शब्दही काढला नसता, असही आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केलं. या द्वीटमध्ये ते लिहितात, “दादा तुम्ही माझ्यावर वयक्तिक बोलला नसतात तर … मी तर आपल्या विरोधात एक शब्द काढला नव्हता मग माझ्या वर दर वेळेस वैयक्तिक टीका कश्या साठी?”, असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी अजित पाव यांना केला आहे. (Jitendra awhad on Ajit Pawar)
दादा तुम्ही माझ्यावर वयक्तिक बोलला नसतात तर …मी तर आपल्या विरोधात एक शब्द काढला नव्हता
मग माझ्या वर दर वेळेस वयक्तिक टीका कश्या साठी? https://t.co/r2WKuyHFbz— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 6, 2023