दिनेश सोनवणे
दौंड – मध्य रेल्वेच्या पुणे-सोलापूर लोहमार्गावरील बोरीबेल (ता. दौंड) येथील रेल्वे स्थानकावर पुणे-सोलापूर पॅसेंजर गाडी थांबावी. अशी मागणी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे प्रवास्यांनी केली आहे.
या मागणीचे निवेदन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार सुप्रिया सुळे,आमदार राहुल कुल यांच्यासह यांच्यासह दौंडचे रेल्वे स्टेशन प्रबंधक यांना यांना प्रवास्यांच्या वतीने बोरीबेलचे सरपंच नंदकिशोर पाचपुते यांनी दिले आहे. यावेळी
बोरीबेल रेल्वे स्थानकावरून अनेक नागरिक पुणे, दौंड, सोलापूरकडे ये जा करतात. परंतु, स्थानकावर गाड्या थांबत नसल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. त्यामुळे प्रवास्यांची गैरसोय होत आहे. जर पुणे-सोलापूर पॅसेंजर गाडी थांबली तर नागरिकांना प्रवासासाठी सुखकर मार्ग उपलब्ध होईल. तसेच भिगवण, पंढरपूर या पॅसेंजर गाड्या चालू झाल्यास मोठा फायदा होणार आहे. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रदुर्भावाम्मुळे रेल्वे प्रशासनाने गाड्या रद्द केल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने हळूहळू रेल्वे गाड्या सुरळीत केल्या आहेत. त्याचप्रमाणे रेल्वे प्रशासनाने पुणे सोलापूर पॅसेंजर गाडीही सुरु केली आहे. मात्र, गाडीला बोरीबेल रेल्वे स्थानकावर थांबा दिला नाही. गाडीला थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या वतीने वेळोवेळी मागणी केली आहे. तरी ही पॅसेंजर गाड्या थांबत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.