राहुलकुमार अवचट
यवत : यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटस, राहू, भांडगाव, वाखारी परिसरात अवैधरीत्या गावठी (हातभट्टी) दारू तयार करीत असलेल्या ८ ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह ८ जणांवर गुन्हा दाखल केलाआहे.
यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटस, राहू, भांडगाव, वाखारी परिसरात अवैधरीत्या गावठी (हातभट्टी) दारू तयार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पाटस (१), राहू (२) भांडगाव (२), वाखारी (२) येथे कारवाई करण्यात आली. त्यानुसार दोन महिलांसह आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच या कारवाईत गावठी हातभट्टी, देशी व विदेशी असा हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस व पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे, केशव वाबळे, पद्मराज गंपले, संजय नागरगोजे, पोसई मदणे यांच्या पथकाने केली आहे.