लोणी काळभोर : मागील दोन महिन्यापूर्वी पूर्व हवेलीतील वीजग्राहकांना महावितरणच्या नावाने बनावट मेसेज पाठवून सायबर चोरट्याने गंडा घातल्याची घटना ताजी असतानाच, आता ”एल अँड टी कन्स्ट्रक्शन” या कंपनीच्या नावाखाली एका सायबर चोरट्याने पूर्व हवेलीतील व्यापाऱ्यांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज सिंग असे गंडा घालणाऱ्या सायबर चोरट्याचे नाव आहे. सिंग हा सर्वात प्रथम सोशल मिडीयाच्या माध्यमातून नागरिकांचे फोन नंबर घेतो. त्यानंतर सिंग ९८३४९१६१७९ या क्रमांकावरून नागरिकांची संपर्क करतो. आणि माझ्या कंपनीची विविध कामे द्यायची आहे. कोण आहे का. असेल तर सांगा. असे सांगतो? त्यानंतर सदर व्यक्ती आपल्या मित्राचा किंवा नातेवाईकांचा नंबर देते.
त्यानंतर मिळालेल्या माहितीचा फायदा घेऊन सिंग हा नंबर दिलेल्या मित्राची किंवा पाहुण्याची ओळख सांगतो. त्यांना एल अँड टी कन्स्ट्रक्शन कंपनीचा खरेदी व्यवस्थापक असल्याची बतावणी करतो. तुम्हाला माझ्या कंपनीची कामे देतो. तुमचे आधारकार्ड आणि पॅन कार्ड अशी कागदपत्रे मागवून घेतो. व पुणे एअरपोर्ट युटिलिटी बिल्डींग गेट क्र. २ च्या जवळ या. तुम्हाला कंपनीत जाण्यासाठी ५ ते १० हजार रुपयांचा गेट पास काढावा लागेल. त्यासाठी माझ्या नंबरवर ऑनलाईन पेमेंट करायला लागेल. असे सिंग सांगतो.
दरम्यान, काम मिळणार त्या अनुशंघाने व्यापारी तत्काळ सिंगच्या खात्यावर ऑनलाईन पेमेंट जमा करतात. व सिंगने सांगितलेल्या ठिकाणी जातात. तेव्हा त्या ठिकाणी सदर कंपनी नसती. त्यानंतर व्यापारी सिंगला फोन करतात, परंतु तो फोन उचलत नाही.
पूर्व हवेलीतील नागरिकांची अशा प्रकारची फसवणूक झालेली आहे. मात्र, ज्या नागरिकांची फसवणूक झालेली आहे अद्याप ते पुढे आलेले नाहीत. या प्रकारच्या फसवणुकीची तक्रार सायबर पोलिसांकडे आलेली नाही. जर अशा प्रकारची नागरिकांची फसवणूक झाली असेल तर नागरिकांनी पोलिसांकडे संपर्क साधावा. असे पुणे सायबर पोलिसांनी केले आहे.