पुणे : पुण्यातील बोपोडी येथे दारू पिण्याच्या कारणावरून आईला मारहाण करत बुक्की मारून दात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाला दारू पिण्याचं व्यसन आहे. त्याने आपल्या आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र, मुलगा सतत दारू पितो म्हणून आईने पैसे दिले नसल्यामुळे मुलाने आईच्या तोंडावर जोरात बुक्की मारली. यामुळे तिचे दात पडले, आणि तिला जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मुलगा एवढ्यावरच थांबला नाही, तर या वेळी त्याचे वडील आणि पत्नी हे दोघे भांडण सोडविण्यासाठी मध्ये आले, असता मुलाने वृद्ध वडिलांनादेखील शिवीगाळ करत ढकलून देऊन खाली पाडले. याबाबत ऑगस्टिन ज्यो डिसुजा (वय ८३) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून डॉमनिक ऑगस्टिन डिसुजा (रा. सम्राटनगर, बोपोडी) याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, डॉमनिक हा बेकार आहे. त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्याने दारू पिण्यासाठी आईकडे पैसे मागितले. आईने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने रंगाच्या भरात चिडून आईच्या तोंडावर जोरात ठोसा मारला. या घटनेत आई जखमी झाली.