पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना नाशिकहून निनावी पत्र आलं असून या पत्रात धक्कादायक माहिती असल्याचा दावा अंधारे यांनी केला आहे. या पत्रामध्ये नाशिकमधील ४० जणांची नावं आहेत. (Sushma Andharen)
यामध्ये पोलीस, राजकीय आणि इतरांची नावे आहेत. मात्र, त्यात कसलेही पुरावे नाहीत. असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं. पुढे बोलताना म्हणाल्या, यासंदर्भात आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली असून, त्यांच्याशी चर्चा केली आहे. हे पत्र खरं की खोट याबाबत तपास करावा, तसेच ललित पाटीलप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर अंधारे यांनी पत्रकारांशी संवांद साधला.
त्या पुढे बोलताना म्हणाल्या, नाशिकवरून एक निनावी पत्र आले असून यामध्ये काही राजकीय आणि इतरांची नावे आहेत. मात्र, त्यामध्ये कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे हे पत्र पोलीस आयुक्तांकडे देण्यात आले असून ललित पाटील प्रकरणाचा अधिक तपास करून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी, तसेच येरवडा कारागृहातून त्याला बाहेर ससून रूग्णालयात दाखल करण्यासाठी कोणी प्रयत्न केले. याची चौकशी व्हायला हवी, असं सुषमा अंधारे यांनी सांगितले. (Drug Mafia Lalit Pati)