पुणे : पद्मावती येथील श्रीनिवास विनोद शेटे या सात वर्षांच्या चिमुकल्याने बेळगाव (कर्नाटक) येथे झालेल्या सर्वात मोठे रोलरस्केट वाक्य १०३९ हे रोलरस्केट्सने बनविण्यात सहभाग घेतला होता. याची दखल घेऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने चिमुकल्याला अधिकृत प्रमाणपत्र दिले आहे. या यशाबद्दल श्रीनिवासचे सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.
बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबच्या वतीने ‘द लार्जेस्ट रोलर स्केट सेन्टेन्स फॉर्मेशन’ आणि ‘लार्जेस्ट स्केट मोटो फॉर्मेशन’चे आयोजन करण्यात आले होते. हे सर्वात मोठे रोलरस्केट वाक्य १०३९ रोलरस्केट्सचे बनलेले आहे. यामध्ये ‘द लार्जेस्ट रोलर स्केट सेन्टेन्स फॉर्मेशन’ या उपक्रमाला गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची मान्यता दिली आहे. या स्पर्धेमध्ये पुण्यातील श्रीनिवास शेटे हा चिमुकला सहभागी झाला होता. त्याने अनेक स्पधांमध्ये भाग घेऊन यश मिळविले आहे. त्याला स्केटिंग प्रशिक्षक चंद्रकांत यांचे मार्गदर्शन लाभले.
श्रीनिवास शेटे हा सहकारनगर येथील अरणेश्वर विद्या मंदिरात इयत्ता पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्याचे वडील विनोद आणि आई शकुंतला हे दोघेही पुण्यातील नामवंत वकील आहेत. तो गेल्या दोन वर्षापासून स्केटिंगचे प्रशिक्षण घेत आहे. त्याने मिळविलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.
दरम्यान, शिवगंगा एक रोलर्सकेटर क्लब आहे. आणि नियमितपणे जीडब्ल्यूआर व्हिडिओ आणि सोशल मीडियाचे अनुसरण करते. यातून प्रेरित होऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरण्याचे त्यांचे स्वप्न होते. रोलरस्केटिंग हा शिवगंगाच्या जीवनाचा एक मोठा भाग आहे. म्हणून संदेश आणि साहित्याचा विक्रम साध्य करण्यासाठी वापरला जातो.