नवी दिल्ली : सध्या क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यापूर्वी क्रेडिट कार्ड मिळवण्यात अडचणी येत होत्या. पण आता क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नुकत्याच सणासुदीच्या काळात पॉइंट ऑफ सेल आणि ई- कॉमर्स पेमेंटमध्ये मजबूत वाढीमुळे भारतीयांचा क्रेडिट कार्डवरील खर्च 25.35 टक्क्यांनी वाढून ऑक्टोबर 2023 मध्ये 1.78 ट्रिलियन रुपयांच्या नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे.
ग्राहकांकडून नवीन वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. सप्टेंबर 2023 मध्ये क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणारा खर्च 1.42 ट्रिलियन रुपये होता. केडिट कार्ड प्रमुख एचडीएफसी बँकेचे व्यवहार गेल्या महिन्यात 38661.86 कोटी रुपयांवरून 45173.23 कोटी रुपयांवर घसरले. आयसीआयसीआय बँकेच्या व्यवहारांमध्ये 34158 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
ऑक्टोबरमध्ये क्रेडिट कार्डावरील सगळ्यात जास्त व्यवहार हे मुख्यतः सणासुदीच्या हंगामाच्या सुरुवातीमुळे आणि ग्राहकांनी विविध वस्तूंची खरेदी केल्याने दिसले होते. त्यामुळे आता क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणारे व्यवहार वाढल्याचे दिसून येत आहे.