अमोल दरेकर
सणसवाडी : सणसवाडी येथील सरस्वती आटा मिलला भीषण आग लागली. मिलच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आगीने रौद्ररूप धारण केले होते. मात्र, या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आटा मिल कंपनी सणसवाडी गावाच्या भरवस्तीत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. आग लागल्याचे समाजात वाघोली येथील पीएमआरडीच्या अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले होते. (Fire News)
यावेळी स्थानिक पाणी पुरवठा करण्याच्या वतीने पाणी टँकर मागवण्यात आले. अथक प्रयत्नातून आग आटोक्यात आणण्यात आली. मिल बंद असल्यामुळे यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात यंत्र सामग्री जळून खाक झाली आहे.
यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी, स्थानिक प्रतिनिधी आणि अग्निशमन दल यांच्या प्रयत्नाने या आगीवर नियंत्रण मिळण्यात यश आले.