सणसवाडी : गृहपाठालाच सुट्टी’ असे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकरांचे संकेत अशा आशयाची बातमी टिव्ही व पेपरला वाचल्यावर मन सुन्न झालं. आणि गृहपाठा ऐवजी परीपाठ हरीपाठ अशा काहीतरी संस्कारक्षम उपक्रमात मुलांना गुंतवून ठेवा. नाहीतर ती टीव्ही डीजे मोबाइलच्या चक्रव्युव्हात अडकून बरबाद होतील. तेव्हा गृहपाठा ऐवजी हरीपाठ द्यावा, असे आवाहन पत्रकार ज्ञानेश्वर मिडगुले यांनी मरकळ प्रशालेत बोलताना शिक्षण मंत्र्याना केले.
पहिली ते चौथीचे विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारचे विचाराधीन असून तज्ञांसी चर्चेअंती निर्णय घेऊ सांगतांना मुलांच्या मेंदुला ताण नको म्हटले. आता गृहपाठच नाही म्हटल्यावर मुले बेडरपणे मोबाईल टीव्हीच्या चक्रव्युव्हात अडकून बरबाद होतील अशी भिती मिडगुले यांनी व्यक्त केली आहे.
मुलांना गुलाम बनविणारी बिटीशकालीन शिक्षण पद्धती नकोच असे तज्ञांचे मत आहे . स्वामी विवेकानंदांनी ‘ मन , मनगट आणि मेंदूचा विकास म्हणजे शिक्षण’ अशी व्याख्या सांगीतली. आता जिम प्राणायाम व्यायाम क्रिडाप्रकार खेळल्या बागडल्याने मुलांची मनगटं बळावतील. तीच मनगटं मोबाईल मध्ये भरकटल्याने डोळे व मेंदूही खराब होतील. आणी मनाचा सर्वांगीण विकास करणेसाठी अध्यात्म संत साहित्यातील अभंग भजन गायनाने मन चित बुद्धी शांत पवित्र एकाग्र होऊन पुन्हा शाळेत अभ्यासातही मन रमेल. कोरोनाआधी परीपाठात अभंग घेत, तसे आता गृहपाठाऐवजी हरीपाठ घ्या. गृहपाठाला ३ तास माथेफोड करणेऐवजी गावचे मंदिरात ६ वाजता वारकर्यांचा हरीपाठ होतो. तेथे पाउनतास सत्कारणी लावत त्यांचे समवेत सात्वीक नाचत ‘ हरी मुखे म्हणा – हरी .. ‘मुखे म्हणायला लावा शरीराला व्यायामही होतो.
गाताना नादब्रम्हात मग्न होत मनही स्थिर पवित्र एकाग्र होत मेंदूलाही संस्काराचा खुराक मिळतो. या हरीपाठातून मन मनगट मेंदू ताकतवार होण्याचे तिनही संकेत साध्य होतात. म्हणाल, पोरांना कुठे हरीपाठाला जुंपता ते मोठ्या माणसांनी करायचं असतं! अहो, शंभूराजांनी नखशिखा बुद्धभुषणादी ग्रंथ १४ व्या वर्षी लिहीले’ ज्ञानेश्वरानी १६ व्या वर्षी अखंड विश्वाला ज्ञान देणारी ज्ञानेश्वरी लिहीली, मुक्ताईने ९ व्या वर्षी ताटीचे ४२ अभंग लिहीले, मग या बालपणातच मुलांना अध्यात्माची गोडी लागली तर ती सुसंस्कारीत पारमार्थिक बनून सुखी समाधानी यशस्वी बनतील. शिवाय गावचीच गायक वादक महाराज तयार झाल्याने हरीनाम सप्ताहासाठी आळंदीतून भाड्याने गायक आणावे लागणार नाहीत हे वेगळेच.
शिक्षणमंत्री महोदय गाता नाचता हरीपाठातील अभंगाचे एका चरणाचाच अर्थ समजवा’, ‘अवघाची संसार सुखाचा करीन ! आनंदे भरीन तिन्ही लोक ! ‘घरच्या चार माणसांचा संसार सुखाचा करीन म्हटले नसून साऱ्या जगाचा संसार म्हटलंय , आणी आपल्या घरातले तिन्ही लोक नसुन स्वर्ग मृत्यु पाताळ ही तिन्हीही आनंदाने भरीन, असा विशाल उदातअर्थ एका चरणात सामावलाय, तर सर्व संत साहित्यात किती भावार्थ असेल, म्हणून शालेय जिवनातच छोट्याशा हरीपाठाद्वारे मुलांना अध्यात्माची संस्काराची गोडी लागून सुजान नागरीक चांगला माणुस म्हणजेच भारताचे भविष्य घडेल, देशाती अज्ञान दुःख दैन्य हटेल, या आशावादापोटीच शिक्षण मंत्री महोदयांनी गृहपाठ हटवल्यास ‘हरीपाठ’ घ्यावा असे आवाहन आहे.
दरम्यान, आपण शाळा कॉलेजांनी स्वतः समाजधुरीणांच्या सौजन्याने व्याख्यान दिल्यावर हरीपाठ वाटतो. आजपर्यंत १८ हजारावर हरीपाठ वाटप केले असून लाखावर हरीपाठ विद्यार्थ्यांना वाटण्याचा माणस आहे, गृहपाठ जावून हरीपाठ धोरण शिक्षणमंत्री महोदयांनी साकारल्यास दहा लाखावर हरीपाठ वाटपाचा संकल्प करतो.