Kartiki Ekadashi Mahapuja : पंढरपूर : कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार आहे. कार्तिकी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा गुरुवार २३ नोव्हेंबर २०२३ रोजी साजरा होत आहे. त्यासाठई कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून प्रशासनाने राज्यातील वातावरण शांत राहाव यासाठी सकल मराठा समाजाच्या पाच मागण्या मान्य केल्या आहेत. तर, मागण्या मान्य झाल्यामुळे मराठा समाजाने आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेतील सहभागाचा मार्ग मोकळा झाला आहे.
यंदा २३ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरात विठ्ठल रूक्मिणीची शासकीय पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. काय आहेत सकल मराठा समाजाच्या ५ मागण्या पाहूयात,
- सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने कुणबी जातीच्या नोंदी वेगाने शोधणे
- मराठा भवन बांधणे
- सारथीचे उपकेंद्र सुरू करणे
- मराठा विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह बांधणे
- मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांचा वेळ मिळणे
फडणवीस दुपारी तीन वाजता पंढरपूरात येणार
पहाटे अडीज वाजता पूजा सुरू होणार आहे. तर कार्तिकी एकादशी निमित्त संताचे लहान मोठे पालखी सोहळे पंढरपूरनजीक दाखल झाले आहेत. येथील ६५ एकर येथे देखील लाखांवर भाविक दाखल झाले आहेत. भाविक राहुट्या, तंबू, मंडप उभारुन वास्तव्य करु लागले आहेत. ६५ एकरात भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती येथील प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे. तर ठरल्याप्रमाणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत ३० मिनिटे चर्चा करणार आहेत. त्यासाठी ते आज २२ नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी एक दिवस आधीच पंढरपूरात येणार आहेत.