पुणे : दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी योजना राबविण्यात येईल. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली येथील आढावा बैठकीत प्रशासनाला दिले.जिल्ह्यातील प्रलंबित वैद्यकीय महाविद्यालय तातडीने सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीला गेले. गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावरुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पूर परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.
त्यानंतर गडचिरोली मध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती निवारण व्यवस्थापन आढावा बैठक झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे उपस्थित होते. जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी पर्जन्यमान, पुर स्थिति याबाबत माहिती दिली.