अहमदाबाद: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये फायनलचा सामना सुरु झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
फायनल सामन्यासाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दोन्ही संघामध्ये मागील सामन्यातीलच खेळाडू आहे.
टीम इंडिया XI:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया XI:
डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवुड.