पुणे : बदलती जीवनशैली, आहारातील अनियमितता यांसारख्या कारणांमुळे शारीरिक दुखणं सुरु होतं. त्यापैकी एक म्हणजे पाठदुखी. सध्या अनेकांना पाठदुखीच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पण असे काही उपाय आहेत या पाठदुखीवर घरगुती उपचार करून आराम मिळवता येऊ शकतो.
पाठदुखीचा त्रास हा हाडांच्या ठिसूळपणामुळे होऊ शकतो. त्यामुळे आहारात साजूक तूप, दूध, उडीद, मासे अशा पदार्थांचे सेवन करु शकता. त्यामुळे शरीरातील कॅल्शियमची मात्रा वाढते आणि दुखणे कमी होतो. तसेच योगा केल्यासही फायदा होऊ शकतो. योग्य पद्धतीच्या मदतीने तुम्ही पाठदुखीवर उपाय करु शकता. यामध्ये त्रिकोणासन, भुजंगासन, मार्जरासन यांसारख्या सोप्या आसनांचा वापर तुम्ही करु शकता. त्यामुळे तुमची पाठदुखी कमी होण्यस मदत होईल.
पाठदुखीचा त्रास होत असल्यास त्यावर उपाय म्हणून दररोज तेलाने मालिश करावी. यामुळे पाठदुखीचा त्रास कमी होऊ शकतो. नारळ किंवा मोहरीच्या तेलात चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकून तेल चांगलं गरम करावं. नंतर तेल थंड झाल्यानंतर त्या तेलानं पाठीची हलक्या हातानं मालिश करावी. त्याचप्रमाणे तुम्ही बदामाच्या तेलाचा वापर देखील करु शकता.
याशिवाय, पाठदुखीवर मीठाच्या पाणीची अंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. कारण, पाठदुखीच्या समस्येत स्नायूची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे स्नायू मोकळे करण्यासाठी मीठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास आराम मिळतो. मीठमुळे तुमच्या शरीरातील स्नायू मोकळे होण्यास मदत होईल.