नवी दिल्ली : करचुकवेगिरी करणाऱ्या किंवा इतर मार्गाने कर भरणा टाळणाऱ्या कंपन्या अथवा व्यक्तींवर आयकर विभागाकडून कारवाई केली जाते. त्यात आता गुगल, ॲपल आणि ॲमेझॉन या कंपन्या कर न भरल्याबद्दल आयकर विभागाच्या (Income Tax Dept) रडारवर आल्या आहेत. यामध्ये 5 हजार कोटींहून अधिक रकमेचा घोळ झाल्याची माहिती दिली जात आहे.
ॲमेझॉन सेलर सर्व्हिसेस, इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, गुगल इंडिया, डिजिटल सर्व्हिसेस, प्रायव्हेट लिमिटेड आणि ॲपल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. सध्याच्या चौकशीत कर विभाग तीन प्रमुख टेक कंपन्या ॲपल, ॲमेझॉन आणि गुगलच्या जाहिरात खर्च, रॉयल्टी, ट्रेडिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेगमेंट्स या आणि मार्केटिंग संबंधित सेवांच्या व्यवहारांची तपासणी करत आहे.
आयटी विभाग आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या व्यवहारांच्या नियमांचे पालन करतात की नाही याची वारंवार तपासणी करत असते. ज्या कंपन्या नियमांचे पालन करत नाहीत. त्यांच्यावर आयटी विभागाकडून कारवाई केली जाते.