यवतमाळ : बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी यवतमाळ जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर येत आहे. शहरालगत असलेल्या वाघाडी जांब येथे शिवसैनिकाची चाकूने वार करून खून केला आहे. योगेश नरहरी काटपेलवार (36) रा. देवीनगर लोहारा असं हत्या केलेल्या शिवसैनिकाचे नाव आहे. हत्येनंतर काटपेलवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शहरात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. (Yavatmal Crime )
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, योगेशची हत्या जुन्या वादातून झाली असावी असा प्राथमिक अंदाज शहर पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच घटनास्थळावरून एका संशयित व्यक्तीसह महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून या हत्येमागील मुख्य आरोपी कोण याचा तपास यवतमाळ ग्रामीण पोलीस करत आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी संजय पुज्जलवार, ग्रामीण ठाणेदार प्रकाश तुनणकलवार, सहाय्यक निरीक्षक राहुल शेजव दाखल झाले आहेत. (Shiv Sena)
जुन्या वादाचा वचपा काढल्याचा पोलिसांचा अंदाज
जुन्या वादातून ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळावर दाखल झाले असून एका संशयित व्यक्तीसह महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमागे मुख्य आरोपी कोण याचा तपास पोलीस करत आहेत.