दिनेश सोनवणे
दौंड : दौंड तालुक्यातील पश्चिम भागातील बोरिएंदी आणि भरतगाव परिसरातील पशूंना लंपी आजार झाला आहे. तालुक्यात लंपी आजाराचा शिरकाव झाल्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर झाल्या आहेत. या परिसरातील १० किलोमिटर परिसरातील सर्व पशुपालकांनी योग्य खबरदारी घ्यावी. असे आवाहन दौंड तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
लंपी आजारात पशूंना भरपूर ताप येणे, चारा न खाणे, जनावराच्या डोळ्यातून आणि नाकातून चिकट द्रव येणे, अंगावर गाठी येणे, दूध कमी देणे आणि पायावर सूज येऊन लंगडणे ही आजाराची लक्षणे आहेत. या आजाराचा प्रसार डास, चावणाऱ्या माश्या, गोचीड, चीलट, बाधित जनावरांचा चारा, आणि स्पर्श यामुळे होतो. आणि लोकांनी घाबरून जाऊ नये, हा आजार योग्य उपचाराने पुर्ण बरा होतो.
दरम्यान, लंपी आजाराने प्रादुर्भाव झालेल्या जनावराचे दूध खाल्ले तरी मानवी आरोग्यावर कुठलाही विपरीत परिणाम होत नाही. कारण आपण सर्वजण दूध किंवा दुधाचे पदार्थ उकळून तयार करत असल्याने एकदा दूध उकळ्यावर हे विषाणू अजिबात राहत नाहीत. त्यामूळे दूध उत्पादकांनी आपल्या पशुधनाची योग्य ती काळजी घ्यावी.
संपूर्ण भारतात थैमान घालणारा लंपी आजाराचा प्रादुर्भाव दौंड तालुक्यातील पसरला आहे. तालुक्यात लसीकरण मोहीम देखिल मोठया प्रमाणात चालू केली आहे. सुदैवाने अजुन देऊळगाव राजे परिसरात हया आजाराचे अजुन एकही जनावर सापडले नाही. पण चुकून कोणाच्या जनावराला काही प्रादुर्भाव दिसला तर तोबडतोप पशुवैदयकीय दावाखण्यात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.