लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी येथील वातावरण, निसर्ग संपदा मन मोहित करते. हे शहर मला खूप आवडते. या शहराच्या पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार आहे. असे आश्वासन केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिले आहे. .
केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी पाचगणी येथील सुप्रसिध्द ‘पुरोहित नमस्ते’ या उपहारगृहाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी वरील आश्वासन दिले. यावेळी जिव्हाळा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किशोरभाई पुरोहित, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मेहूल पुरोहित, माजी नगरसेविका नंदिनी बुटाला,नमस्तेचे व्यवस्थापक भारत पुरोहित, मंगेश उपाध्याय, रोटरी क्लबचे अध्यक्ष भुषण बोधे, किरण पवार, हिमांशू पुरोहित,अमिन हाजी,धवल पुरोहित,विरेन माने आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, मेहूल पुरोहित यांनी दिवसेंदिवस शहर व परिसरातील वाढती वाहनसंख्या त्याच बरोबर पर्यटन हंगामात मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांना कराव लागत असणारा वाहतूक कोंडीचा सामना या समस्येकडे लक्ष वेधले आणि लवकरात लवकर पार्किंग सुविधा निर्माण करण्याची विनंती केली होती.
यावेळी आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हलचे संयोजक, पुरोहित नमस्ते, शहर भाजप शाखा व व्यावसायिकांच्या वतीने केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांना शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर फेस्टिव्हलमध्ये हजर राहण्याचे निमंत्रण दिली. तेव्हा नाईक यांनी फेस्टिव्हला हजर राहणार असल्याचे सांगितले आहे.