लोणी काळभोर, (पुणे) : मुल होण्याकरीता विवाहितेला काळे कपडे न वापरणे तसेच भोंदूबाईने दिलेले कुंकु दिवसा व रात्री झोपताना लावण्याची जबरदस्ती करुन विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे. हि घटना शेवाळवाडी येथे २७ डिसेंबर २०२० ते २० एप्रिल २०२२ दरम्यान घडली आहे.
याप्रकरणी एका २६ वर्षाच्या महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पती, दीर, सासु सासरे यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचारासह जादुटोणा प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय महिलेचे कुटुंबीय हे माता निर्मला देवी यांच्या आश्रमात नेहमी जात असतात. फियादीचा विवाह झाल्यानंतर त्यांना मुल होण्याकरीता काळे कपडे घालून देत नसत. तसेच आश्रमातून आणलेले कुंकु दिवसा व रात्री झोपताना लावणे अशी जबरदस्ती त्यांच्यावर केली जात होती. फिर्यादीचा पती वारंवार अनैसर्गिक संबंध ठेवत होता.
दरम्यान, फिर्यादी गर्भवती असल्याचे माहिती असतानाही त्यांच्याशी संबंध केल्याने गर्भस्त्राव होण्यास कारणीभूत ठरून त्यांचा गर्भपात घडून आला. तसेच फिर्यादी यांना नांदवण्यास नकार देऊन त्यांचा शारीरीक व मानसिक छळ केला म्हणून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.