IND vs NZ : मुंबई: आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना खेळवला जाईल. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल. या मैदानावर नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे मानले जाते. वास्तविक, वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे आहे. या खेळपट्टीवर फलंदाज मोठे फटके सहज मारतात. मात्र गोलंदाजांसाठी आव्हान सोपे नसेल.
मात्र, या मैदानावर नवा चेंडू वेगवान गोलंदाजांना मदत करतो, मात्र यानंतर गोलंदाजांच्या समोरचे आव्हान वाढते. विशेषत: वानखेडेच्या छोट्या ब्राउंड्रीमुळे फिरकीपटूंसाठी कठीण आव्हान आहे. या मैदानावर आयपीएल सामन्यांमध्ये बहुतेक कर्णधारांना नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणे आवडते, म्हणजेच संघांना धावांचा पाठलाग करायचा असतो. परंतु, वनडे फॉरमॅटमध्ये फलंदाजांव्यतिरिक्त गोलंदाजांना विकेट घेण्याची संधी असते, जर गोलंदाजाने चांगल्या लाईन आणि लेन्थवर गोलंदाजी केली तर फलंदाजांना अडचणी येईल.
उपांत्य फेरीतील विराट कोहली आणि रोहित शर्माचे आकडे धडकी भरवणारे!
त्याचबरोबर या मोठ्या सामन्यात भारतीय चाहत्यांच्या नजरा विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या खेळाडूंवर असतील. मात्र विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत विराट कोहलीचे आकडे चाहत्यांसाठी चांगले संकेत नाहीत. खरंतर, विराट कोहली चौथ्यांदा एकदिवसीय सेमीफायनलमध्ये खेळणार आहे. म्हणजेच आतापर्यंत विराट कोहली 3 वेळा सेमीफायनलमध्ये खेळला आहे, परंतु हा अनुभवी फलंदाज केवळ 11 धावा करू शकला आहे. रोहित शर्मा पहिल्यांदा 2015 विश्वचषक उपांत्य फेरीत खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात रोहित शर्माने 48 चेंडूत 34 धावांची खेळी केली. यानंतर रोहित शर्मा विश्वचषक २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनल खेळला. त्या सामन्यात रोहित शर्मा फक्त 1 धाव काढली होती. अशाप्रकारे, विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील रोहित शर्मा आणि विराट कोहलीची कामगिरी खूपच खराब झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.