Health Tips: पुणे प्राईम न्यूज डेस्क: मानवी जीवन जगत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पण असे काही आजार, विकार असतात त्याकडेही दुर्लक्ष करून चालत नाही. जर चुकूनही दुर्लक्ष झाल्यास त्याचे नंतर गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. त्यातीलच एक म्हणजे घाबरल्यासारखं वाटणं.
अनेकांना कधीतरी अचानक घाबरल्यासारखं, अस्वस्थ वाटत असतं. मात्र, असे काही उपाय आहेत त्याचा अवलंब केल्यास नक्कीच फायद्याचे होऊ शकते. त्यामध्ये केळ आणि डांगराच्या बियांना विशेष असे महत्त्व आहे. यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम ही खनिजं मोठ्या प्रमाणात असतात. हे घटक शरीरातील इलेक्ट्रोलाइट समतोल साधण्यास मदत करतात. हा समतोल शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास आवश्यक असतो.
याशिवाय, घरी विरजलेल्या दह्यात ट्रायप्टोफन हा घटक असतो. दह्यात पचनास मदत करणारे विकर असतात. हे विकर आपल्या आतड्यात निर्माण होतात. आतड्यातील हे जीवाणू घातक आजारांशी लढतात. त्यामुळे रोजच्या आहारात ताजं, घरी विरजलेलं दही खाल्ल्यास आतड्यांचं आरोग्य सुधारतं. यामुळे मनातील चिंता आणि ताण कमी होतो.
ओमेगा 3 हा घटक उपयुक्त
शरीरातील दाह, सूज आणि चिंता रोगाची लक्षणं घालवण्यास ओमेगा 3 हा घटक उपयुक्त ठरतो. घरातील साजूक तूप शरीराला ओमेगा 3 हा घटक पुरवण्यास पुरेसा आहे. शरीराची ओमेगा 3 ची गरज भागवण्यासाठी 1 छोटा चमचा साजूक तूप रोजच्या आहारात घ्यावा, याने फायद्याचे ठरू शकते.