Job Alert पुणे : नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुकांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस दलात कॉन्स्टेबल पदांसाठी भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेत एकूण 248 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे.
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस दलात कॉन्स्टेबल पदासाठी भरती केली जात असून, यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून, 28 नोव्हेंबर, 2023 पर्यंत ही शेवटची तारीख आहे. यात 248 जागांसाठी भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 21700 ते 69100 पर्यंत पगार मिळू शकणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) – क्रीडा कोटा.
– रिक्त पदे : 248 पदे.
– शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण.
– वयोमर्यादा काय? : या भरती प्रक्रियेत अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षे असणे गरजेचे आहे.
– किती मिळू शकते वेतन? : या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला 21700 ते 69100 रुपयांपर्यंत पगार मिळू शकणार आहे.
– कसा करावा अर्ज? : यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
– अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 13 नोव्हेंबर 2023.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 नोव्हेंबर 2023.
या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट http://recruitment.itbpolice.nic.in/ वरून माहिती घेता येणार आहे.