Health News: पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपण आपले आरोग्य सुदृढ राहावे यासाठी प्रयत्न करत असतो. पण असे काही आजार आहेत, ते काही केल्या आपला पिच्छा सोडत नाहीत. त्यापैकी एक म्हणजे मळमळ किंवा उलटी येणे. अनेकांना मळमळ किंवा उलटी आल्यासारखं होत असतं. त्यामागची कारणे देखील वेगवेगळी असू शकतात. पण असे काही घरगुती उपाय आहेत त्याचा अवलंब केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.
उलटी किंवा मळमळ होत असल्यास त्यावर लवंग गुणकारी मानली जाते. लवंग खाल्ल्याने देखील होणारी मळमळ कमी होते. यामध्ये अँटी बॅक्टेरिअ गुणधर्म असतात. त्यामुळे तुम्हाला जर मळमळ होत असेल तर लगेच लवंग तोंडात ठेवावी. तुम्हाला आराम मिळेल. तसेच आलंही गुणकारी असते. मळमळ होत असेल तर आल्याचा चहा प्यावा. आलं बारीक करून पाण्यात उकळून पिऊ शकता. आल्याचा तुकडा तोंडात ठेवल्यास लगेच बरे वाटू शकते.
नारळ पाणी, लिंबू पाणी घ्यावे
जेव्हा तुम्हाला उलटीचा त्रास जाणवतो, तेव्हा शरीरात पाणी कमी होते. यामुळे अॅसिडिटी वाढते. म्हणून नारळ पाणी, लिंबू पाणी किंवा साधे पाणी प्यावे, असे केल्याने चांगलाच आराम मिळतो. याशिवाय, पुदिना खाणे पोटासाठी फायदेशीर असते. यामुळे पचनसंस्था सुरळीत कार्य करतेच आणि मळमळ किंवा उलट्या झाल्यास पुदिन्याची पाने चावून खावीत. तुम्ही पाण्यात पुदिना उकळून पाणी देखील पिऊ शकता.
बडीशेपने मिळतो थंडावा
बडीशेप खाल्याने मळमळ होणे कमी होते. बडीशेप हळूहळू चावून खाल्यास पोटालाही थंडावा मिळतो. तुम्हाला लगेच आराम मिळेल. तुम्ही पाण्यात उकळून सुद्धा बडीशेपचे पाणी पिऊ शकता, याने उलटी किंवा मळमळ होण्यापासून आराम मिळू शकतो.