पुणे : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात नेमकी कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातच देशभरात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा चालू आहे. याशिवाय महाराष्ट्रात सध्या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्षावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. त्यातच आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट केली आहे. त्यांनी केलेल्या पोस्टने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
काय आहे पोस्टमध्ये?
जितेंद्र आव्हाड यांनी आज दुपारी एक्स (ट्विटर) हॅण्डलवरून एक पोस्ट शेअर करत महाराष्ट्रातील आणि देश पातळीवरील निवडणुकांबाबत अंदाज व्यक्त केला आहे. ते म्हणाले, दिल्लीच्या राजकीय सट्टा बाजारात आज सहज काही लोकांशी बोलत होतो. महाराष्ट्राच्या बाबतीतले त्यांचे अंदाज ऐकून मला स्वत:लाच धक्का बसला.
त्यांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडीला ३१ ते ३३ जागा मिळतील आणि महायुतीला (भाजपा, एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट) १५ ते १७ जागा मिळतील, येणा-या काळात या 5 राज्यातील निवडणूकींचा परीणाम हा संपूर्ण देशभरात दिसू लागेल आणि ह्या 5 राज्यांचा त्यांचा अंदाज असा आहे की, 5 पैकी कमीत-कमी 4 राज्ये काँग्रेस जिंकेल. राहुल गांधींची जोरदार हवा आहे. असं आव्हाडांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दिल्लीच्या राजकीय सट्टा बाजारात आज सहज काही लोकांशी बोलत होतो. महाराष्ट्राच्या बाबतीतले त्यांचे अंदाज ऐकून मला स्वत:लाच धक्का बसला. त्यांचे म्हणणे आहे की, महाविकास आघाडीला 31 ते 33 जागा मिळतील आणि महायुती (भाजपा, एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट) यांना 15 ते 17 जागा मिळतील.
येणा-या…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 9, 2023