Nitesh Rane : मुंबई : भाजपा नेते नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत हेनेहमीएकमेकांवर टीका करत असतात. आता तर नितेश राणेंनी मोठा धक्कादायक खुलासा केला आहे. संजय राऊत यांना येत्या 24 डिसेंबर रोजी अटक होणार असल्याचा दावा नितेश राणेंनी केला आहे. याशिवाय महायुती सरकारमध्ये गॅंगवॉर सुरू असल्याच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांनी चांगलच उत्तर दिलेल आहे. माझ्या माहितीनूसार सर्वकाही आलबेल आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांबद्दल जे गलिच्छ विचार मांडले आहेत. त्यावर उद्धव ठाकरे यांनी काहीही प्रतिक्रीया दिलेली नाही. सनातन धर्मावर टिका झाली तरी त्यांनी काही म्हटलेलं नाही. संजय राऊतांकडून गलिच्छ मानसिकतेचं प्रदर्शन झाले असून त्यांना 24 डिसेंबर रोजी अटक होणार असल्याचा खळबळजनक दावा भाजपा नेते नितेश राणे यांनी केला आहे.
संजय राऊत गलिच्छ मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. महिलांबद्दल अपमान होऊनही यावर काही बोलत नाहीत, स्वप्ना पाटकर यांच्या घरावर रात्री एक वाजता बाटल्या फेकल्याची बातमी आली आहे. कोण स्वप्ना पाटकर ? ज्यांना शिव्या देताना संजय राऊत यांची क्लिप व्हायरल झाली होती. सुजित पाटकरला अटक झाली तो राऊत यांचा भागीदार आहे.
नितेश राणे पुढे म्हणाले की स्वप्ना पाटकर यांच्या घरात भीतीचं वातावरण आहे. मी त्या महिलेच्या कुटुंबाला भेटणार आहे. कुणी त्या महिलेला धमकावत असेल तर त्या व्यक्तीला आम्ही सोडणार नाही. दिशा सालियन आणि सुशांत प्रकरणातही केस चालू आहे. आदित्य ठाकरे आणि रिया यांचे चॅटींग आहे, अशी माहीती याचिकाकर्ते यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी याचिकाकर्त्याला 50 खोक्यांची ऑफर दिली आहे. ही माहीती खोटी असेल तर आमच्यावर अब्रु्नुकसानीचा दावा टाका असेही नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.