मुंबई : जेव्हा बााबासाहेब पुरंदरेंना मी विरोध केला, तेव्हा मला खासदार सुनील तटकरे यांनी विरोध करत दम दिला होता, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) यांनी केला आहे. आमदार आव्हाड यांच्या दाव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली आहे. मराठ्यांच्या विरोधात जो चुकीचा इतिहास लिहिला होता, त्याला मी विरोध केला. त्यावेळी सुनील तटकरेंनी मला दम देत बोलू नको असं सांगितलं होतं, असा दावा आव्हाडांनी केला आहे. आव्हाडांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले, मराठ्यांच्या जो विरोधातील इतिहास चुकीचा लिहिला होता, त्याला मी जोरदार विरोध केला. त्यावेळी खासदार तटकरेंनी मला दम देत बोलू नको असं सांगितलं होतं. मात्र, शरद पवार यांनी मला सांगितलं की, मी तुझ्या पाठिशी तुला जे बोलायचं ते बोल. दोन दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल तटकरेंनी मी क्षुद्र असल्यामुळे माझ्यावर टीका होत असल्याचे म्हटले होते. त्यावर आव्हाड म्हणाले, हे बोलत असताना जरा मागे वळून बघितलं असतं तर तुम्हाला जी पद मिळाली ती चांगल्या चांगल्या घरण्यांना मिळाली नाहीत. शेकापने आदिती तटकरेंना जिल्हापरिषदेचे अध्यक्ष केवळ शरद पवार यांच्या शब्दामुळे बनवलं. तसेच तुम्हाला मंत्रिपद, पुतण्या, मुलगा, भाऊ, सगळ्यांना आमदारकी दिली तुम्हाला वेळी खासदारकी दिली. पालकमंत्री पद मला न देता तुमच्या मुलीला दिलं.
मी क्षुद्र आहे
आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, बाबासाहेब पुरंदरे यांनी कुणब्यांविषयी वाईट लिहिलं होतं. तेव्हा मी त्यांना विरोध केला होता. तेव्हा तुम्ही विरोध तर केलाच नाही उलट मला वक्तव्य मागे घेण्यासाठी दम दिलात. त्यानंतर शरद पवार यांच्याशी बोललो आणि त्यांनी माझं वक्तव्य मागे घेतलच पाहिजे असं नाही असंही त्यांनी सांगितलं. मी कायम सांगतो मी क्षुद्र आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. क्षुद्र म्हणजे काय ते आधी समजून घेतलं पाहिजे. जातीय जनगणनेसाठी क्षुद्रांसाठी उभे राहावे लागेल. तुम्ही कधीही न वापरलेलं शास्त्र वापरलं आणि आता तुम्ही ते वापरायला नको होतं.
मी पुरंदरे यांच्या बाबतीत अजिबात चुकलो नाही
त्यावेळी मला पवार साहेब म्हणाले होते, सुनील तटकरे आणि आणखी एक नेता सकाळी माझ्याकडे येतात आणि म्हणतात भाजपकडे चला. मी बाबासाहेब पुरंदरे यांच्या बाबतीत अजिबात चुकलो नाही. ते पुस्तक वर्णव्यवस्थेवर अवलंबून होते. त्यावेळी पुरंदरे यांची बाजू घेतली होती. आताचा तुमचा जीआर काय कामाचा ?. मराठ्यांना तुम्ही फक्त आश्वासनं देत आहे, असे देखील आव्हाड म्हणाले.
जाती जातीत भांडणं लावणं योग्य नाही
आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) म्हणाले, खऱ्या अर्थाने कोणाला आरक्षणाची गरज असेल तर ती वंचित समाजाला आहे. आरक्षण म्हणजे आर्थिक उन्नतीचे साधन नव्हे, हे बाबासाहेबांनी सांगितलं होतं. गावाच्या सीमेबाहेर राहणाऱ्या लोकांसाठी आरक्षण होतं. बाबासाहेबांनी त्या लोकांना माणसांत आणलं. जगातील प्रत्येक राष्ट्रात आरक्षण आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळलच पाहिजे. जाती जातीत भांडणं लावणं योग्य नाही.