पुणे : भाजपाच्या केंद्रीयमंत्री रेणुकासिंह या उद्या (बुधवार) पासून तीन दिवस शिरूर लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात तब्बल एकवीस विविध कार्यक्रम होणार असुन, या दौऱ्यांची सुरवात भोसरी येथुन होणार असल्याची माहिती भाजप आमदार माधुरी मिसाळ व संयोजक धर्मेंद्र खांडरे दिली आहे.
केंद्रीयमंत्री रेणुकासिंह यांचा दौरा बुधवारी (ता. १४) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सुरु होणार आहे. यामध्ये सकाळी ९ वाजता भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली शिरूर लोकसभा मतदार संघातील समस्याबाबत चर्चा सभेचे आयोजन केले आहे. त्यानंतर जिल्हा अधिकारी मंडळ व अध्यक्ष यांच्याशी चर्चा, सकाळी ११ वाजता मोर्चा संवाद अधिकारी आणि जेवण १२ वाजण्याच्या सुमारास आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी दर्शन, आळंदी ते केंद्रे महाराज शाळा, दुपारी १२ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास संत सावंद येथे भेट,
दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास माजी सैनिक आणि स्वातंत्र्य सेनानी यांच्यात चर्चा, दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लाभार्थ्यांशी संवाद, ४ वाजता हॉटेल राजरत्न पासून प्रवास निलकमल मंगल कार्यालयाल राजगुरुनगर पर्यंत, ४.२० ते ५ पर्यंत विचार परिवार समरसता बैठक, ५ वाजून १० मिनिटांनी हुतात्मा राजगुरू वाड्याला भेट व राजगुरू परिवारासोबत चहापान, ५ वाजून ३० मिनिटांनी राजगुरुनगर ते प्रवास हॉटेल जीवन पर्यं, मंचर, सायंकाळी ६.१० वाजता स्थानिक वृत्तवाहिन्यांना मुलाखत, सायंकाळी ७.१० वाजण्याच्या सुमारास प्रेस आणि आदिवासींसोबत डिनर कार्यकर्ता, रात्री ९ वाजता हॉटेल स्क्विरल, ए/पी शिनोली, ता. आंबेगाव, येथे मुक्काम.
गुरुवारी (ता. १५) सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी हॉटेल स्क्विरल ते प्रवास भीमाशंकर, ७ वाजून ४५ मिनिटांनी भिमाशंकर दर्शन, ८ वाजून १५ मिनिटापासून ते १० वाजेपर्यंत भीमाशंकर पासून प्रवास सावरगाव हिरडा कारखाना मार्गे (खानापूर) जुन्नर, सकाळी १० ते सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन व आदिवासी समाजसेवक यांचा सत्कार, १० वाजून १५ मिनिटांनी शिवनेरीपासून प्रवास ते नारायणगाव पर्यंत, १० वाजून ३५ मिनिटांनी अमृतची पाणी पुरवठा योजना (जलजीवन मिशन), उद्घाटन, सकाळी १०.३० ते ११.३० वाजण्याच्या सुमारास संस्थात्मक कार्यक्रम, बैठक जिल्हा परिषद प्रमुखांसह, सदस्य आणि इतर नेत्यासह बैठक नारायणगाव, निलयम मंगल कार्यालयात पार पडणार आहे.
सकाळी ११.३० ते १ प्रवास हॉटेल निलय पासून नारायणगाव ते शिरूर मार्गे भीमाशंकर साखर कारखानापर्यत, १ वाजण्याच्या सुमारास शिरूर नगरपालिकेत दुपारचे जेवण, १.४५ ते २. ४५ वाजण्याच्या सुमारास शिरूर नगर पालिकेत आढावा बैठक, २.४५ ते ३.५ पर्यंत शिरूर ते रांजणगाव एमआयडीसी, रिया कार्यालय प्रवास, ३.५ ते ४.५ पर्यंत सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक,सहकार अधिकारीसंस्था आणि व्यापारी प्रतिनिधी यांच्याशी चर्चा, ४.५ ते ४.३० मिनिटांनी रांजणगाव ते शिक्रापूर प्रवास, ४.३० ते ४. ४० पर्यंत (जनऔषधी) जेनेरिक मेडिकल शॉप व्हिजिट, ४.४० ते ५ वाजेपर्यंत शिक्रापूर ते सणसवाडी प्रवास,
५ ते ५.५० वाजेपर्यंत आयटी, सोशल मीडिया, युवा मोर्चाचे पदाधिकारी यांच्यासह बैठक, ५.५० ते ६.२० सणसवाडी ते वढू बुद्रुक प्रवास, ६.२० ते ६.४० छत्रपती संभाजी महाराज समाधी दर्शन, ६.४० ते ७.१० वढू बुद्रुक ते वाघोली प्रवास, ७.१० ते ८.१० तरुण आणि नवीन मतदार यांच्याशी संवाद, रात्री ८.१० ते ८.२० श्रेयस कार्यालयातून प्रवास हॉटेल शांग्रीला पर्यंत, रात्री ८.२० ते ९ वाजेपर्यत मतदार, डॉक्टर, इंजिनियर व वकिलांशी संवाद, ९ ते ९. ४५ पर्यंत संध्याकाळचे जेवण, ९. ४५ ते १० वाजेपर्यंत वाघोली ते VVIP प्रवास सर्किट हाऊस, पुणे १० वाजता VVIP प्रवास सर्किट हाऊस, पुणे येथे मुक्काम.
शुक्रवारी (ता. १६) सकाळी ८ वाजता VVIP सर्किट हाऊसपासून ते ९ वाजता उरुळी कांचन येथे प्रवास, सकाळी ९ ते ९. ४५ पर्यंत स्वातंत्र्य रॅलीचा अमृत महोत्सव व उरुळी कांचन निसर्गोपचार आश्रमास भेट तसेच (मणिभाई देसाई व महात्मा गांधी यांचा मुक्काम असलेल्या ठिकाणी भेट), ९. ४५ ते १०.१५ पर्यंत उरुळी कांचन ते विठ्ठलनगर, हडपसर प्रवास, १०.१५ ते ११ पर्यत 2 सामाजिक कार्यक्रम (बूथ क्रमांक ११५समिती बैठक आणि बूथ भेट), ११ ते ११.२० विठ्ठलनगर हडपसर ते वैदूवाडी प्रवास, ११.२० ते १२.४० च्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, प्रतिनिधींसोबत बैठक, आनंद शितोळे दादाकडे जेवणासाठी त्यांच्या घरी, दुपारी १२. ४० ते १ दरम्यान महिला मोर्चा आणि महिला संवाद रॅलीच्या प्रतिनिधींशी संवाद (वैदू वाडी ते काळे पडळ), वृक्षारोपण, १ ते १.४० दरम्यान वैदुवाडी ते कोंढवा बुद्रुक या ठिकाणी प्रवास,
१.४५ ते २.३० दरम्यान मुख्य गावांना भेट, मतदारसंघ आणि भेटीगाठी प्रमुख मतदार, २.३० ते ३.१५ प्रवास, दुपारी ३.१५ ते ३.३० राखीव, ३.३० ते ४ दरम्यान, पुण्यातील गणेश भेगडे कार्यालयाला भेट, सायंकाळी ४ ते ५ च्या दरम्यान पुण्यात आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.