Pune News : पुणे : ससून रूग्णालयात गेली नऊ महिन्यांपासून उपचार घेत असलेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला हार्निया असल्याचे कारण देत त्याच्या आजारावर स्वतः ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनीच उपचार केल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. कैद्यांसाठी असलेल्या वाॅर्ड क्रमांक १६ मध्ये संजीव ठाकूर यांच्याकडूनच ललित पाटील याच्यावर उपचार केल्याची नोंद ससूनच्या रजिस्टरमध्ये आढळली आहे.
आमदार रवींद्र धंगेकर यांचे ससूनच्या डीनवर गंभीर आरोप
दरम्यान, ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले रूग्ण चार-पाच दिवस उपचार घेऊन, बरे होतात आणि पुन्हा माघारी जातात. मात्र, ड्रग्ज तस्कर ललित पाटील उपचारासाठी तब्बल ९ महिने ससून रूग्णालयात तळ ठोकून बसला होता. ललित पाटीलला अटक झाल्यानंतर तो नऊ महिने ससूनमध्ये कोणत्या आजारावर उपचार घेत होता, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. (Pune News) अधिष्ठाता संजीव ठाकूर यांना काही दिवसांपूर्वी हाच प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, ललित पाटील यांच्या आरोग्याप्रश्नी उच्च न्यायालयाकडूनही पत्र आले होते. त्यानुसार, तज्ज्ञ डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्या तपासणीनंतर न्यायालयाला उत्तर पाठवण्यात आले. ललित पाटील याला चार ते पाच प्रकारचे आजार झाले होते. परंतु नेमके कोणते आजार झाले होते, हे ठाकूर यांनी सांगितले नाही.
याच दरम्यान, आमदार रवींद्र धंगेकर यांनी ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कोणत्याही रुग्णालयाचे अधिष्ठाता रुग्णावर उपचार करत नाहीत. मात्र, संजीव ठाकूर यांच्या आशीर्वादामुळे ललित पाटील ९ महिने ससूनमध्ये राहिला आहे. ठाकूर यांनी ललित पाटीलला सहकार्य करून मोठी माया जमवली आहे. (Pune News) त्याच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी, अशी मागणी आमदार धंगेकर यांनी केली आहे. हर्नियाच्या आजारावरील उपचारासाठी नऊ महिने लागत नाहीत. तरिही ललित पाटीलला रुग्णालयात राहून ड्रग्ज रॅकेट चालवण्यास अप्रत्यक्षरित्या मदत केल्याप्रकरणी संजीव ठाकूर यांच्या अडचणीत वाढ होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : शिवाजीनगरमध्ये काम करायचंय? दरमहा दहा हजार खंडणीची मागणी
Pune News : ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान ९ नोव्हेंबरपर्यंत शस्त्र बाळगण्यास निर्बंध लागू