मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी जोरदार मागणी कार्यकर्ते करत आहे. त्यानंतर शरद पवार हे माढ्यातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र, शरद पवारांनी आज भूमिका स्पष्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभानिहाय आढावा बैठकीत शरद पवारांनी आगामी निवडणुकांसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे सांगत शरद पवारांनी सर्व चर्चांवर पडदा टाकला आहे.
खासदार शरद पवार यांनी राज्यातील प्रमुख लोकसभा मतदारसंघांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी माढ्याचा आढावा घेताना कार्यकर्त्यांनी शरद पवारांनीच या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवावी अशी मागणी केली. शरद पवारांनी 2009 मध्ये बारामती सोडून माढा या मतदारसंघाला पसंती दिली होती आणि त्या ठिकाणाहून निवडूनही आले होते. त्यानंतर शरद पवार माढ्यातून निवडणूक क लढवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
हेही वाचा:
Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आठ मोठे निर्णय!