पुणे प्राईम न्यूज : ‘बिग बॉस 17’ची (Big Boss 17) धमाकेदार सुरुवात झाली आहे. दरवेळेप्रमाणेच यावेळीही हा शो त्याच्या कंटेंटमुळे चर्चेत आला आहे. यावेळी सलमान खानने आपल्या शोमध्ये एकापेक्षा एक स्पर्धक आणले आहेत. बिग बॉसच्या या सीझनमध्ये विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींना आणण्यात आले आहे.
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची वकील सना रईस खान देखील या शोचा एक भाग आहे. एक स्पर्धक म्हणून सना ‘बिग बॉस 17’ मध्ये म्हणून आली आहे. मात्र, सलमान खानच्या शोमध्ये येणे तिला चांगलेच महागात पडल्याचे दिसत आहे. सनावर बिग बॉसच्या घराबाहेर आरोप केले जात आहेत. सनाने बार कौन्सिलच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे वृत्त समोर आले आहे.
सना कायदेशीर अडचणीत अडकली
वकील आशुतोषने सना रईस खानने बिग बॉसमध्ये भाग घेतल्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेप व्यक्त केला आहे. एक पोस्ट शेअर करताना ते म्हणाले की, ‘मी याबाबत बार कौन्सिल ऑफ इंडियाला कळवले आहे. सना रईस खानने नियमांविरुद्ध बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे.’ (Big Boss 17)
त्यांनी असेही लिहिले आहे की, ‘बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियम 47 ते 52 नुसार कोणताही वकील इतर कोणत्याही प्रकारे पैसे कमवू शकत नाही. इतकंच नाही तर 1961 च्या कलमानुसार प्रॅक्टिसिंग वकिलांना इतर कोणत्याही क्षेत्रात पूर्णवेळ नोकरी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सनाबद्दल बोलायचं तर सनाचा या शोमध्ये फारसा सहभाग दिसत नाही.
हेही वाचा:
Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आठ मोठे निर्णय!