पुणे : बडीशेप प्रत्येक घरात वापरली जाते जी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याची चव सर्वांनाच आवडते. आजींच्या घरगुती उपायांमध्ये बडीशेपच्या सर्व प्रकारच्या फायद्यांचा उल्लेख आहे.रोजच्या खाण्यात बडीशेप खाल्ल्यास अनेक समस्या दूर होऊ शकतात. बडीशेपमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात जे पोटाच्या समस्या दूर करतात.
बडीशेप चघळल्याने तोंडाचा वास निघून जातो व पचनक्रिया व्यवस्थित राहते. याशिवाय अॅसिडीटी, आंबट ढेकर यासारख्या समस्यांवर मात करण्यासाठी बडीशेप उत्तम आहे.चला, जाणून घेऊया त्याचे फायदे-
– हृदयासाठी फायदेशीर
बडीशेपमध्ये भरपूर फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम असते, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. यामध्ये आढळणारे फायबर कोलेस्ट्रॉल सारख्या हृदयरोगाचा धोका कमी करते.
– त्वचेसाठी फायदेशीर
बडीशेप पाणी पिण्यापासून ते त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावण्यापर्यंत अनेक प्रकारे त्याचा वापर करता येतो. बडीशेप ब्लड सर्कुलेशनमध्ये ऑक्सिजन संतुलन निर्माण करून हार्मोन्स संतुलित करते. याने चेहरा थंड राहतो व याने चेहऱ्यावर एक छान ग्लो येतो.
– बीपी ठेवते कंट्रोल
जर उच्च रक्तदाबाची तक्रार असेल तर बडीशेप खाण्यास सुरुवात करा. बडीशेप चघळल्याने लाळेतील नायट्रेटची पातळी वाढते. हा नैसर्गिक घटक रक्तदाब पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. याशिवाय बडीशेपमध्ये पोटॅशियम भरपूर असते, जे रक्तदाब आणि हृदयाचे ठोके कंट्रोल करतात.
– स्वाद अन् चांगले आरोग्यसाठी
बडीशेप प्रत्येक घरात वापरली जाते जी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याची चव सर्वांनाच आवडते. आजींच्या घरगुती उपायांमध्ये बडीशेपच्या सर्व प्रकारच्या फायद्यांचा उल्लेख आहे.
– पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी
शरीर डिटॉक्स करायचे असेल तर बडीशेपचे पाणी उपाशी पोटी प्या. यामुळे चरबी जमा होणार नाही. बडीशेपचे पाणी उपाशी पोटी प्यायल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. त्यात पोटॅशियम असते ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. बडीशेपचे पाणी पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे.
– हॉटेलमध्ये बडीशेप का दिली जाते?
हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवल्यानंतर मिश्री आणि बडीशेप दिली जाते. हे कशासाठी केले जाते, याचे कारण म्हणजे बडीशेप ही थंड असते आणि अन्न पचवण्यास मदत करते. बडीशेप आणि साखर कँडी अनेकदा रेस्टॉरंटमध्ये जेवणानंतर खायला दिली जाते. हे उत्तम माउथ फ्रेशनर म्हणून काम करते.