नवी दिल्ली: माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिमोठा लासा मिळाला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मलिक यांच्या अंतरिम जामिनाची मुदत तीन महिन्यांनी वाढवली. वैद्यकीय जामीन नाकारणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आहे. मलिक यांना विशेष वैद्यकीय मदत मिळत असून त्यांच्या आरोग्याच्या किंवा जगण्याच्या अधिकाराचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने सांगितले की, मलिक यांना किडनीच्या आजाराने ग्रासले आहे आणि 11 ऑगस्ट रोजी त्यांना दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्याचवेळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी अंतरिम जामीनाच्या मुदतवाढीला विरोध केला नाही.