पुणे : सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरील सुनावणी देखील २७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. ‘निवडणूक चिन्हासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीला स्थगिती देऊ नये’ असा अर्ज मंगळवारी (६ सप्टेंबर) शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला. त्यावर, आज (७ सप्टेंबर) तातडीने सुनावणी घेण्यात आली.
सत्ता संघर्ष संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ स्थापन केले आहे. यामध्ये धनंजय चंद्रचूड, एम आर शहा, कृष्ण मुरारी, हिमा कोहली आणि पी नरसिंहा या न्यायमूर्तींचा समावेश आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाले असले तरी सत्तासंघर्ष सुरुच आहे.
दरम्यान, शिंदे गटाने आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आता घटनापीठ काय निर्णय देणार याचीच उत्सुकता आहे. त्यामुळे पुढील सुनावणी हि २७ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.