पुणे : यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत आज मंगळवारी (ता.६) होणाऱ्या भारत-श्रीलंका लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारताला या स्पर्धेत आव्हान टिकवायचे असेल तर आगामी दोन्ही सामने जिंकणे भारतासाठी गरजेचे आहे.
सध्या सुपर-४ फेरीतील सामने खेळवले जात आहेत. या फेरीत ४ सप्टेंबर रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारताचा पराभव झाला. याच कारणामुळे ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत-श्रीलंका लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या लढतीत भारत सर्वोकृष्ट संघ उतरविण्याच्या तयारीत आले. त्यामुळे भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या सामन्यात यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या ऐवजी अनुभव व फिनिशर म्हणून दिनेश कार्तिकला पुन्हा संधी दिली जाऊ शकते. रवींद्र जडेजा जायबंदी झाल्यामुळे भारतीय संघात दीपक हुडाला संधी देण्यात आली होती. त्याच्याजागी अक्षर पटेलचा भारतीय संघात समावेश होऊ शकतो. तर फिरकीपटू युझवेंद्र चहलने आशिया चषकात खास कामगिरी करून दाखवलेली नाही. त्यामुळे चहलची जागा अश्विनला दिली तर संघामध्ये फिरकीपटूंमध्ये विविधता येईल. अश्विनकडे मोठा अनुभव आहे. त्यामुळे श्रीलंकेविरोधातील सामन्यात तो या अनुभवाचा वापर करू शकेल.
१) भारतीय संघ असा असू शकतो
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, दिनेश कार्तिक, आवेश खान, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन.
२) श्रीलंका संघ असा असू शकतो
श्रीलंका : दासुन शनाका (कर्णधार), दानुष्का गुनाथिलक, पथुम निसांका, कुसल मेंडिस, चरित अस्लंका, भानुका राजपक्षे, अशेन बंदारा, धनंजय डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, महिष तेक्षाना, जेफ्री वांडरसे, प्रवीण जयविक, कारनानाना, फेर्नानाना, धनंजय डी सिल्वा. ,अशेन बंडारा, धनंजय डी सिल्वा आणि दिनेश चंडिमल