युनूस तांबोळी
शिरूर : विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणामुळे शिक्षकांना देखील महत्व प्राप्त झाले आहे. व्यक्तिमताच्या परीवर्तनाच्या अंतीम टप्प्यावर विद्यार्थ्याच्या मनावर चांगले विचार बिबंवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. विदयार्थ्यांना आयुष्यात दैवत्व मिळवून देण्याचे काम शिक्षक करतात. त्यामुळे देव्हाऱ्यातल्या देवा बरोबर अक्षरांची ओळख करून देणाऱ्या शिक्षणाने समृद्ध करणाऱ्या शिक्षकांना नमस्कार केलाच पाहिजे. पण तरूण विद्यार्थ्यांनी मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग
चुकीच्या ठिकाणी वापर करू नका. असे प्रतीपादन चैतन्य महाराज वाडेकर यांनी केले.
कान्हूर मेसाई ( ता. शिरूर ) येथील विद्या विकास मंडळच्या विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिना निमित्त झालेल्या व्याख्यान मालेत विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्राचार्य अनिल शिंदे, संस्थेचे अध्यक्ष गंगाधर पुंडे, सचिव सुदाम तळोले आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रात्साविक प्राचार्य अनिल शिंदे यांनी केले.
वाडेकर म्हणाले की, समाजात चुकीच्या माध्यमातून तरूणांची शक्ति व बुद्धिचा वापर करून घेतला जात आहे. त्यामुळे आपली संगतीवर बरी वाईटचा परीणाम जाणवत असतो. सुंस्कृत शिक्षणाने आपल्या जीवनाची प्रगती झाल्यास त्यांचा परीणाम राज्य आणि देशावर होत असतो.
यावेळी संस्थेचे संचालक लहू तळोले, बाबुराव दळवी, राजेंद्र ननावरे, अमोल रामदास पुंडे, मोहन पुंडे, दीपक तळोले आदी शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण यांनी केले. तर आभार मच्छीन्द्र राऊत यांनी मानले.