Health News : आरोग्याकडे, आहाराकडे विशेष लक्ष देण्याचा अनेकजण सल्ला देत असतात. पण काहीजण त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, अनेक आजार बळावतात. मात्र, हा आजारपण आलाच तर तो घालवण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असावी लागते. ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी कशी हे बहुतांश जणांना माहिती नसते. याची आपण माहिती घेणार आहोत…
पालेभाज्यांचा आहारात समावेश..
आपण लहानपणापासून ऐकत आलोय की पालेभाज्यांचा आहारात समावेश असावा. नेहमी हिरव्या भाज्या खाण्यावर भर दिला पाहिजे. हे अन्न प्रत्येक आवश्यक पोषकतत्वाची कमतरता पूर्ण करण्याचा सर्वात नैसर्गिक पर्याय मानला जातो. या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, प्रथिने यांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ते रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
पाणी भरपूर प्यावे..
पाण्याला जीवन म्हटलं जातं. हे खरंच जीवन आहे. दिवसभर पुरेसे पाणी पिणे आणि हायड्रेटेड राहणे हा निरोगी जीवनाचा मंत्र आहे. हायड्रेशन शरीराच्या कार्याचे नियमन करण्यास मदत करते. यामुळे चयापचय गतिमान होते. हे शरीरातील अनेक अनावश्यक घटक बाहेर काढण्यास मदत करते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते.
औषधी वनस्पतींचा वापर केल्यास उत्तमच..
दालचिनी, जिरे, हळद आणि इतर स्वयंपाकघरातील मसाले हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. चव वाढवण्यासोबतच औषधी वनस्पती आणि मसाले देखील औषध म्हणून वापरले जातात. या औषधी वनस्पती आणि मसाले अँटीऑक्सिडंट, दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणांनी भरपूर असल्याने हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
फळांचे सेवन आरोग्यदायी..
पालेभाज्यांसोबत फळे हे देखील आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. फळे खाणे यातून शरीराला एक विशेष ऊर्जा मिळते. ही फळे आपण खाऊ शकतो किंवा त्याचा रस करूनही घेऊ शकतो. असे केल्याने शरीराला चांगला फायदा होतो. याशिवाय, प्रोबायोटिक्स खाणे आरोग्यासाठी वरदानच आहे. हे आतडे निरोगी ठेवण्यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावते. दही, ताक, लस्सी इत्यादी दैनंदिन आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जातो.