पुणे : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर पुण्यातील बंडगार्डन परिसरातील ‘डी मोरा’ पबमध्ये लाखो रुपयांचा सट्टा लावल्याचा धक्कादायक प्रकार पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. पोलिसांनी रविवारी (ता.४) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कारवाई करून सट्टा घेणाऱ्याला अटक केली आहे.
श्रीपाद यादव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून मोबाइल, सट्टा व लाखो रुपयांची रोकड जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ‘डी मोरा’ पबमध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर सट्टा घेण्यात येत आहे. अशी माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा पबमध्ये छापा टाकला. तेव्हा आरोपी श्रीपाद यादव हा सामन्यावर घेऊन सट्टा घेत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. व तेथून मोबाइल, सट्टा व लाखो रुपयांची रोकड जप्त केली आहे.
दरम्यान, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली जात आहे. तरी, पुढील तपास पुणे शहर पोलीस करीत आहेत.