पुणे : सरकारी नोकरी मिळावी, अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी प्रयत्नही केला जातो. मात्र, त्यामध्ये काहींना यश मिळते तर काहींना प्रयत्न करावे लागतात. पण आता तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकते. राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशिमअंतर्गत २४ रिक्ते पदे भरली जाणार आहे. त्यामध्ये आवश्यक पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करावा.
कोणत्या पदांवर भरती होणार?
– कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
एकूण पदे किती?
या भरती प्रक्रियेंतर्गत एकूण 24 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. त्यासाठी www.zpwashim.in या वेबसाईटवरून माहिती घेता येऊ शकते.
किती मिळू शकतो पगार?
– कीटकशास्त्रज्ञ – 30,000/-
– सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – 35000/-
– प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 17000/-
काय असावी वयोमर्यादा?
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे. तर खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे. याशिवाय, राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षे वयोमर्यादा असणार आहे.
नोकरीचे ठिकाण – वाशिम
किती असेल अर्ज शुल्क?
खुल्या प्रवर्गासाठी – रु. 200/-
राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
अर्ज करण्याची पद्धत
या भरती प्रक्रियेंतर्गत उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी अधिकृत वेबसाईट www.zpwashim.in वरून माहिती घेता येऊ शकते.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑक्टोबर 2023