राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : १ ऑक्टोबर महाश्रमदान व २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून, भोसलेवाडी येथे अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड तालुका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भोसलेवाडी व अंगणवाडी विद्यार्थी व शिक्षक यांसह गावातील नागरिकांनी शाळेच्या सभोवताली स्वच्छता मोहीम राबवली. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान विद्यार्थ्यांकडून उत्साहात साजरे करण्यात आले.
‘स्वच्छता ही सेवा’ अभियान विद्यार्थ्यांकडून उत्साहात साजरे
या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी या मोहिमेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. स्वच्छता मोहिमेअंतर्गत जमा झालेला कचरा गोळा करून पेटवण्यात आला. (Yavat News) या वेळी अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड तालुका विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष समीर लोहकरे, ग्रामपंचायत सदस्य सुनील जगताप, ग्रामपंचायत सदस्य चिंतामणी लोहकरे, तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश गडदे, शिक्षक तानाजी ठोंबरे, शिक्षिका छाया गुंड, म्हेत्रे, माने, यशोदा नवसकर, सागर लोहकरे यांसह शाळेतील विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : जिरेगावातील २०० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
Yavat News : यवत पोलीस स्टेशनतर्फे शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन