Pune News : पुणे : महिलेला २० लाख रुपयांचे ५ कोटी रुपये करण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील नारायण पेठेतून उघडकीस आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात भोंदूबासह ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोंदूबासह ४ जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
तन्वीर शामकांत पाटील, शिवम गुरुजी, सुनील राठोड, आनंदस्वामी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचे व्यावसायिक भागीदार अंकितकुमार पांडे आहेत. तर पांडे यांची जमीन खरेदी व्यवहारातून आरोपी तन्वीर पाटील याच्याशी ओळख झाली होती. (Pune News) दरम्यान, पांडेंनी आरोपी पाटील, शिवम गुरुजी, सुनील राठोड, आनंद स्वामी यांच्याशी ओळख करुन दिली.
दरम्यान, आरोपींनी पांडे आणि त्यांचे परिचित राजपाल जुनेजा आणि तक्रारदार महिलेला वीस लाख रुपयांचे पाच कोटी रुपये करुन देतो, असे आमिष दाखविले. (Pune News) आणि १३ सप्टेंबर रोजी आरोपी महिलेच्या घरी आले. रिकाम्या टाकीत त्यांनी २० लाख रुपये टाकण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी खोलीत धूर केला. हरिद्वार येथे जाऊन विधी करावा लागेल, असे आरोपींनी सांगितले. टाकीतील २० लाख रुपये घेऊन आरोपी पसार झाले.
त्यानंतर महिलेने आरोपींशी महिलेने संपर्क साधला. तेव्हा आरोपींनी प्रतिसाद दिला नाही. महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने पोलिसांकडे तक्रार दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune news : पार्टीवरुन घरी निघालेल्या तरुणीवर मदतीच्या बहाण्याने बलात्कार
Pune News : पीएमपी बसचे गणेशोत्सवात ‘रेकॉर्ड ब्रेक’ उत्पन्न..
Pune News : निवृत्त पोलिसाच्या मुलाची कोयत्याने वार करत हत्या ; पुण्यात प्रचंड खळबळ..