पुणे, ता.२७ : बिल मंजुर करण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथील लेखापालावर तळेगांव दाभाडे पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरेंद्र अनंतराव कणसे (वय ५५, पद- लेखापाल (वर्ग-३) तळेगाव दाभाडे नगरपरिषद) असे गुन्हा दाखल झालेल्या लेखापालाचे नाव आहे. याप्रकरणी एका ३८ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथील कॉन्ट्रॅक्टर असून, त्याना तळेगाव दाभाडे नगरपरिषदे मार्फत स्मशानभुमी मध्ये गॅस शव दाह वाहिनीचा ठेका मिळालेला आहे. तसेच कोव्हीड च्या काळात तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत सॅनिटायझरची फवारणीचा ठेका त्यांना मिळाला होता. तक्रारदार यांनी कोव्हीडच्या काळात सॅनिटायझरची फवारणी केल्याचे बिल मंजुर करण्यासाठी लोकसेवक नरेंद कणसे यांनी तक्रारदार यांचेकडे बिलाच्या एक टक्के रक्कमेची मागणी केली होती. त्यावेळी तक्रारदार यांनी त्यांना सदरची रक्कम दिली नाही.
दरम्यान, सद्यस्थितीत तक्रारदार यांचे गॅस शव दाह वाहिनीचे बिल तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमधील लेखापाल लोकसेवक नरेंद कणसे यांच्याकडे पेंडीग असून, सदर बिल काढण्यासाठी व मागिल बिल काढण्याठी एक टक्क्याप्रमाणे कणसे यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची पडताळणी केली असता, लोकसेवक नरेंद कणसे यांनी तक्रारदार यांच्याकडे कोव्हीड काळात केलेल्या सॅनिटायझर फवारणीच्या प्रलंबित बिलाचे व सद्यस्थितीत गॅस शव दाह वाहिनीच्या बिलाच्या टक्केवारीनुसार मंजुर केलेल्या बिलाचा मोबदला म्हणुन तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी नरेंद्र कणसे यांच्यावर तळेगांव दाभाडे पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत.