अक्षय भोरडे
Shirur News : तळेगाव ढमढेरे : पाबळ (ता. शिरुर) येथील भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील आदर्श शिक्षक प्रा. जितेंद्रकुमार थिटे यांना पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक लोकशाही आघाडी व महिला माध्यमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला सन्मान
पाबळ (ता.शिरुर) येथील भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील आदर्श शिक्षक प्रा. जितेंद्रकुमार थिटे यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत, गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले. (Shirur News) विद्यालयात भूगोल विषयाचे शिक्षण विद्यार्थ्यांना देत असताना देखील आगळेवेगळे उपक्रम राबवले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी नाना होळकर यांच्या हस्ते जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन राजवर्धन शिंदे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संयुक्त महामंडळाचे अध्यक्ष केरुभाऊ ढोमसे, महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष गोरक्षनाथ थोरात, (Shirur News) पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सदस्य रघुनाथ भोसले, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके, प्रा. अनिल साकोरे, सुनील जाधव, आनंदा गावडे, रमेश गावडे, चंद्रकांत थिटे यांसह आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षणामध्ये अनेक नवनवीन विचारप्रवाह येत असून, शिक्षकांनी देखील या आधुनिक नवनवीन संकल्पना समजून घेऊन विद्यार्थी विकासासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे असल्याचे शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष गोरक्षनाथ थोरात यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर दरेकर यांनी केले तर स्वागत युवराज वनवे यांनी केले आणि दत्तात्रय रोकडे यांनी आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : खार ओढ्यात पाय घसरून पडलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला