Shirur News : पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणाकडे राज्यातील सत्ताधारी मंत्री दूर्लक्ष करण्याचे काम करत आहेत. धनगर समाजाची दिशाभूल करणाऱ्या मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा निर्धार शिरूर येथे धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसह इतर मागण्यांसाठी चौंडी येथे उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिरूर, न्हावरे फाटा परिसरातील सकल धनगर समाजाच्या वतीने पुणे-नगर महामार्गावर शेळ्या-मेंढ्या सोडून ‘रास्ता रोको’ करण्यात आला.
या वेळी माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली ठोंबरे, सेवानिवृत्त अधिकारी चांगदेव पिंगळे, यशवंत सेनेचे अध्यक्ष रामकृष्ण बिडगर, शिरूर तालुका रासपाचे अध्यक्ष शिवाजी कुऱ्हाडे, काळुराम मलगुंडे, घोडगंगाचे संचालक बिरा शेंडगे, (Shirur News) प्रभाकर जांभळकर, सोनभाऊ मुसळे, कैलास कोकरे, अशोक कोळपे, स्वराज्य बहुजन संघाचे अध्यक्ष राजाराम दगडे, वैभव कोळपे, कांताराम कांदळकर, सिंधु कऱ्हे, गोरक्ष तांबे, रतन बिडगर पांडुळे, देविदास पवार, संतोष इंगळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये धनगर समाजाचा समावेश ‘एसटी’मध्ये केला आहे. मात्र, स्पेलिंगमधील चुकीमुळे गेली ७० वर्षे सरकार समाजावर अन्याय करीत आहे. धनगर समाज सवलतींपासून वंचित राहिला आहे. याला सत्ताधारी लोक जबाबदार असल्याची टिका आंदोलनकर्त्यांनी केली. (Shirur News) धनगर समाजाने ज्या ज्या वेळी आंदोलन केले, त्यावेळी सत्ताधारी नेत्यांनी आश्वासने देऊन समाजाची फसवणूक केल्याची टिका माजी नगराध्यक्ष मनिषा गावडे, रासपाचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव कुऱ्हाडे यांनी केली.
या वेळी सेवानिवृत्त अधिकारी चांगदेव पिंगळे म्हणाले की, गेली १९ दिवस चोंडीत आंदोलन सुरु असून, सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. (Shirur News) सरकारने वेळेत दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. या वेळी रामकृष्ण बिडगर, माऊली ठोंबरे, अशोक कोळपे, कांताराम कांदळकर, वैभव कोळपे यांची भाषणे झाली.
पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक काही काळ खंडीत
आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर शेळ्या-मेंढ्या सोडल्यामुळे पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक काही काळ खंडीत झाली होती. पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (Shirur News) नायब तहसीलदार स्नेहा गिरी-गोसावी यांनी धनगर समाजाच्या मागणीचे निवेदन स्विकारले.
… तर माजी होण्यास वेळ लागणार नाही!
राज्यसरकार धनगर समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. मात्र, मुख्यमंत्री कोणाला करायचे, हे धनगर समाजच ठरवतो. धनगर समाजाला फडणविस यांनी फसविले तर त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले. त्यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी प्रश्न मार्गी न लावल्यास माजी होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा रासपाचे तालुका अध्यक्ष शिवाजी कुऱ्हाडे यांनी दिला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील गणेश मंडळांचे कार्य उल्लेखनीय : पूर्वा वळसे पाटील