Pune News : पुणे : मोबाईल शॉपीच्या बंद शटरचे कुलूप तोडून, चोरट्यांनी जवळपास ५२ लाखांचे विविध कंपन्यांचे दोनशे मोबाईल व रोख रक्कम चोरून नेल्याची धक्कादायक घटना कोथरूड येथील डहाणूकर कॉलनीत शनिवारी (ता.२३) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
कोथरूड येथील डहाणूकर कॉलनीतील घटना
याप्रकरणी मोबाईल दुकानाचे मालक गौरव सुरेश शिंदे (वय-३१) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोथरूड पोलिसठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव शिंदे यांचे कोथरूड येथील डहाणूकर कॉलनीजवळ कॅफे मोबाईल शॉपी नावाने मोबाईलचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे शिंदे यांनी दुकान शनिवारी संध्याकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास बंद केले. (Pune News) आणि रविवारी (ता/२४) सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता, त्यांना दुकानाचे शटर उघडे असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने दुकानात जाऊन पाहणी केली असता, दुकानातील ५२ लाखांचे विविध कंपन्यांचे दोनशे मोबाईल व १ लाख रुपये रोकड चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
गौरव शिंदे सीसीटीव्हीमध्ये पाहिले असता, त्यांना सीसीटीव्हीमध्ये तीन अज्ञात इसम पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीमधून खाली आले. (Pune News) त्यांनी चेहरे दिसू नयेत म्हणून, काळ्या रंगाच्या टोप्या घातलेल्या दिसतात. यातील एक इसम गाडीजवळ थांबतो व इतर दोघेजण शटर तोडून दुकानात प्रवेश करतात. एक- एक मोबाईल कॅरीबॅगमध्ये भरून, चारचाकी गाडीमध्ये कॅरीबॅग घेऊन पसार होताना दिसत आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती कळताच कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अमर कदम, समीर चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक चैतन्य काटकर यांनी घटनास्थळी भेट दिली. (Pune News) याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक बालाजी सानप करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : राज्यात जोरदार पाऊस पडू दे… अजित पवार यांची कसबा गणपतीसमोर प्रार्थना
Pune News : मद्य पाजून तरुणीवर क्लिनीकमध्ये बलात्कार; डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल