लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : देशातील पहिले पुस्तकांचे गाव असलेल्या भिलार येथील सीसीटीव्ही कॅमेरे निकामी झाल्याने भुरट्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. दिवसाढवळ्या भर वस्तीतून रस्त्याकडेला ठेवलेली गॅस टाकीच चोरून नेली.
नागरिकांची सुरक्षा धोक्यात
भिलार (ता.महाबळेश्वर) येथील सांस्कृतिक हाॅल समोर असलेल्या एका दुकानासमोरील गॅसची टाकी अज्ञाताने शुक्रवारी (ता.२२) सायंकाळी चारच्या सुमारास लंपास केल्याची घटना उघडकीस आली. निलेश दत्तात्रय भिलारे यांनी गणेश विसर्जनादिवशी दुपारी दोन वाजता टाकी भरून घेतली. (Pachgani News) त्याऩंतर ते गणपती मिरवणुकीस जाऊन परत आले असता त्यांना आपली गॅसची टाकी गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली असता टाकीबाबत कसलीही माहिती मिळाली नाही. याअगोदरही या परिसरातून गॅसची टाकी लंपास करण्याचे प्रकार घडले आहेत.
याठिकाणी ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. परंतु सीसीटीव्ही कार्यरत नसल्याने रात्रीच्या वेळी रस्त्याकडेला लावलेल्या दुचाकींमधील पेट्रोल चोरीच्या घटना नेहमीच घडत आहेत. (Pachgani News) सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी ग्रामस्थांनी वारंवार ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना विनंत्या करुनही कसलाही फरक पडत नसल्याने नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
कोणताही मोठा गुन्हा, चोरी, खून अशा गंभीर गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना सीसीटीव्हीची फुटेजची मदत होते. मात्र, भिलार गावच्या चौकाचौकात नागरिकांच्या सुरक्षेसाठी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे निकामी झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. (Pachgani News) याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : पाचगणी शहर व परिसरातील पाच दिवसांच्या गणपतीला भक्तिमय वातावरणात निरोप
Pachgani News : गोंदवले येथील राज्यस्तरीय नाट्य महोत्सवात साताऱ्याच्या ‘पौर्णिमा’ची बाजी